Irshalwadi landslide; इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील बचावकार्य थांबवलं

Update: 2023-07-24 02:56 GMT

खालापूर - रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेनंतर चौथ्या दिवशी अखेर बचावकार्य थांबविण्यात आले आहे. बुधवारी रात्री उशिरा खालापूरजवळील या आदिवासी गावात दरड कोसळून किमान २० घरं दबली गेली असल्याचं म्हटलं होतं. पण गेली चार दिवस सुरू असलेल्या बचावकार्यात पहिल्या दिवशी १०० लोकांना वाचविण्यात आलं तर त्यानंतर आजपर्यंत एकूण २७ मृतदेह ढिगाऱ्याबाहेर काढण्यात आले. सोबतच ९ जनावरे मृत झाली आहेत. २२९ लोकसंख्या असलेल्या या गावातील १२९ नागरिकांना विविध सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

इर्शाळवाडी या गावात जाण्यासाठी रस्तादेखील उपलब्ध नाही ,चौक मानवली येथून पायी जावे लागते, हा परिसर अत्यंत दुर्गम असून सततच्या पावसामुळे परिसरात अजूनही भूस्खलन होत आहे..

एनडीआरएफच्या जवानांसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, यांच्यासह एकूण ४६९ जवान या बचावकार्यात सहभागी आहेत, हा परिसर अत्यंत दुर्गम असून बचावकार्य सुरू असताना काही भागाचे भुस्खलन होत आहे. सोबतच गावातील आणखी ५७ लोक बेपत्ता आहेत, या तीन दिवसादरम्यान ३९९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या सततच्या पावसामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत. दरम्यान बेपत्ता असलेल्या ५७ जणांना मृत घोषित केल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

Tags:    

Similar News