२६ जानेवारीच्या हिसाचारानंतर दीप सिद्धू फरार असून त्यास शोधून काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. त्याची माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून एक लाखांचं बक्षीस घोषित करण्यात आलं आहे.
लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा लावल्या प्रकरणी आणि आंदोलकांना चिथावल्याच्या आरोप असलेला दीप सिद्धू हा सध्या फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दीप सिद्धूची माहिती देणाऱ्यास दिल्ली पोलिसांनी १ लाखांचं बक्षीस घोषित केले आहे. हिंसाचारात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना शोधून काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
दीप सिद्धू बरोबर जुगराज सिंह, गुरजोत सिंह आणि गुर्जंत सिंह यांची माहिती देणाऱ्याला देखील एक लाख रुपयांचे बक्षीस दिला जाणार असल्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केलं आहे. तसंच जजबिर सिंह, बुटा सिंह, सुखदेव सिंह आणि इक्बाल सिंह या आरोपींची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी ५० हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. या सर्वांवर प्रजासत्ताक दिनाला हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आणि हिंसाचारात सहभागी झाल्याचा आरोप आहे.