Republic day : प्रजासत्ताकदिनी महिलांचा सन्मान, 75 महिलांच्या हस्ते ध्वजारोहण
रायगड : देशात 73 वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साही वातावरणात साजरा केला जात आहे. त्यातच रायगड जिल्ह्यात 75 महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करत महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. देशात 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात येत आहे. त्यातच रायगड जिल्ह्यातील रोहा येथील 75 महिलांच्या हस्ते मुख्य रस्त्यावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार सुनिल तटकरे, त्यांच्या पत्नी वरदा तटकरे यांच्यासह सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरीक उपस्थित होते. यावेळी सुनिल तटकरे व वरदा तटकरे यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पुढे बोलताना म्हणाले की, देश एकसंघ व अखंडपणे टिकून आहे, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला समर्पित केलेल्या संविधानाची किमया आहे. तसेच देशात एकता, बंधुता व समानता टिकवून ठेवण्यासाठी सर्व देशवासियांनी योगदान द्यायला हवे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
रोहा येथे 75 महिलांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमीत्त ध्वजारोहण करण्यात आले. तर हा महिलांना दिलेला सन्मान आहे, असे ध्वजारोहण करणाऱ्या महिला प्रतिनिधीने व्यक्त केले. तर त्यांनी सांगितले की, भारतासाठी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन राष्ट्रीय सण आहेत. त्यामुळे दोन्ही सण मोठ्या उत्साहात देशभर साजरे केले जातात. त्याच प्रकारे रोहा येथे 75 महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करून अनोख्या पध्दतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी वरदा तटकरे यांनी सांगितले की, 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने 75 महिलांनी ध्वजारोहण केले. तर या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महिलांनी समोर येऊन ध्वजारोहण केल्याने हा नारी शक्तीचाच सन्मान असल्याची भावना व्यक्त केली.