रेणू शर्माने आता ट्विटरवरून अजित दादांना केलं 'टॅग', म्हणाली...

Update: 2021-03-12 04:05 GMT

मुंबई: सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी गायिका रेणू शर्माने आज पुन्हा एकदा 'त्या प्रकरणावर' ट्विट केलं असून, मात्र यावेळी उपमुख्यमंत्री अजीत पवारांना टॅग केलं आहे.

रेणू शर्माने 11 मार्च रोजी रात्री 10 वाजून 29 मिनिटाला एक ट्विट केलं आहे. ज्यात ती म्हणतेय,"मी गेल्या एक महिनेच नाही तर मागील 5 महिन्यात आजपर्यंत किती फोन केले आहेत. एकदा पहा,मात्र तुम्हा लोकांना काहीच वाटत नाही की आपल्याला कोण का फोन करत आहे." विशेष म्हणजे ह्या ट्विटसोबत रेणू शर्माने अजित पवार यांना टॅग केलं आहे.

विशेष म्हणजे, रेणू शर्माने बुधवारी सुद्धा एक ट्विट केलं होत, ज्यात रेणू म्हणते की,ज्यांनी मला हनी ट्रॅप ब्लॅकमेलर म्हंटलं होतं, त्यांच्या कुटुंबातील महिला हेच करत असतील,त्यामुळे माझ्यावर असे आरोप  करण्यात आले. तर रेणूने केलेल्या ट्विटवर 'पुणेरी' नावाच्या एका अकाऊंटवरून, मग तुम्ही तक्रार मागे का घेतली,लढायला पाहिजे होते तुला सुद्धा न्याय मिळाला असता? असा प्रश्न उपस्थित केला. त्यालाच उत्तर देताना रेणू म्हणते की,मला कोणी न्याय दिला असता?

Tags:    

Similar News