धनंजय मुंडेविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करणारी रेणू शर्मा खंडणी प्रकरणात अटकेत
सामाजिक न्यायमंत्री (Dhanajay munde)धनंजय मुंडे यांना बलात्काराची धमकी महिलेने दिली होती.तसेच त्यांच्या ५ कोटी (5crore) रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.ही महिला इंदौरचीची असून मुंबईतील पोलिस ठाण्यात महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणातील रेणू शर्मा (Renu sharma)या महिलेला इंदौर येथून अटक करुन किल्ला कोर्टात आणल्यानंतर २३ एप्रिल पर्यंत पोलिस काठडी सुनावण्यात आली आहे.;
सामाजिक न्यायमंत्री (Dhanajay munde)धनंजय मुंडे यांना बलात्काराची धमकी महिलेने दिली होती.तसेच त्यांच्या ५ कोटी (5crore) रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.ही महिला इंदौरचीची असून मुंबईतील पोलिस ठाण्यात महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणातील रेणू शर्मा (Renu sharma)या महिलेला इंदौर येथून अटक करुन किल्ला कोर्टात आणल्यानंतर २३ एप्रिल पर्यंत पोलिस काठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात महिलेने काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.काही दिवसांनंतर हि तक्रार मागे घेण्यात आली.त्यानंतर महिलेने फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून बलात्काराची तक्रार देण्याची धमकी धनंजय मुंडेंना दिली. तसेच त्यांना ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी देखील केली. ५ कोटी रुपयांचे दुकान आणि महागडा मोबाईल द्यावा, असा तगादा आरोपी महिलेने मुंडेंकडे लावला. तसेच मागण्या पूर्ण न केल्यास सोशल मीडियावर बदनामी करून पुन्हा बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली होती..
आरोपी महिलेविरोधात पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलिस करत आहेत.
पिछले साल एक कागज सोशल मीडिया पर डाला तो तुम्हारा मंत्री पद जानेकीं नौबत आ गई थी। अब अगर मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी। अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है?' अशा आशयाचे मेसेज सदर महिला पाठवत असून, याद्वारे 5 कोटी रुपये कॅश व 5 कोटी रुपयांचे दुकान विकत घेऊन देण्याची मागणी रेणू शर्माने केली असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
रेणू शर्मा ही महिला मूळ इंदोर मध्यप्रदेशातील असून ती करुणा शर्माची बहीण आहे.मंत्री धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रांच आणि इंदोर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक केली.त्यानंतर इंदौर कोर्टात हजर करण्यात आले.इंदौर कोर्टाने तिचा ताबा दिला आणि त्यानंतर आज रेणू शर्माला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या प्रकरणातील पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे.
आता या प्रकरणावर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देत गेली दीड-दोन वर्षांपासून हा त्रास होत असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी खोटी तक्रार माझ्या विरोधात केली, ती तक्रार परत वापस घेतली. काही दिवसांपासून त्रास होतोय. तो सहन करतो अखेर शेवटी सहनशीलता संपली आणि मला पोलिसांमध्ये तक्रार द्यावी लागली. अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.