प्रसिध्द उर्दू शायर मुनव्वर राणा यांचे निधन

साहित्य विश्वातून एक दुःखद बातमी आहे. प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्वर राणा यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.;

Update: 2024-01-14 19:33 GMT

साहित्य विश्वातून एक दुःखद बातमी आहे. प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्वर राणा यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर लखनऊच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. ते 71 वर्षाचे होते

त्यांना १०१४ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. भारतात वाढत चाललेल्या असहीष्णूतेच्या निषेधार्थ २०१५ मध्ये त्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार सरकारला परत केला होता. देशातील शेतकरी आंदोलनात स्पष्ट भूमिका घेत संसदेला पाडून तिथे शेती करायला पाहिजे असे वक्तव्य केले होते. मुनव्वर राणा यांनी सातत्याने भाजप सरकार विरोधात भूमिका घेतलेली होती. याचा परिणाम म्हणजे लखनऊ विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीतून त्यांचे नाव गायब केले गेल्याचा आरोप त्यांनी केला होता.




 


  • मुनव्वर राणा यांचा जन्म 26 नोव्हेंबर रोजी रायबरेली येथे झाला
  • भारत पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचे काही नातेवाईक पाकिस्तानात गेले
  • शायर वली असी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर त्यांनी उर्दू शायरी लिहायला सुरवात केली
  • १९९७ मध्ये सलीम जाफरी पुरस्काराने सन्मानित केले गेले
  • २००४ मध्ये सरस्वती सन्मान पुरस्काराने सन्मानित केले
  • २००५ मध्ये गालिब पुरस्कार तर २००६ मध्ये त्यांच्या कवितांना इंदोर मध्ये कबीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
  • २०११ मध्ये पश्चिम बंगाल उर्दू अकादमी चा मौलाना अब्दुल राजक महिलाबादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
  • २०१४ मध्ये भारत सरकारचा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला




 


मुनव्वर राणा हे स्पष्ट वक्तेपणाबाबत प्रसिद्ध होते. त्यांच्या अनेक वक्तव्यानंतर वादंग निर्माण झाले होते. राम मंदिर निकालानंतर त्यांनी पूर्व मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

मुनव्वर राणा यांच्या मृत्यूने साहित्य सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.




Tags:    

Similar News