दुर्गम भाग आणि खराब हवामान असल्याने मदत कार्यात अडथळे - अजित पवार

Update: 2023-07-20 06:58 GMT

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरसालगड भागातील ठाकूरवाडी येथे झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत निवेदन केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले की, सध्या मोठ्या प्रमाणत मदतकार्य सुर आहे. मुख्यमंत्री पोहचले आहेत. मंत्री गिरीश महाजन आणि आमदार महेश बालदि घटनास्थळी पोहचले आहेत. तिथं उभे राहायलाही जागा नाही, अशी माहिती आमदारांनी दिली आहे. त्यामुळे सध्या पाणी, बिस्कीट आणि आरोग्य व्यवस्था कामाला लागली आहे. डोंगर उंच आहे. काहीजण वरती जात होते. मात्र डोंगर चढणे शक्य नसल्याने माघारी आले. आता तरुणांची फौज पाठवली आहे. तसेच या घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

तसेच यावेळी अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे तसेच अनेक आमदार डोंगर पायथ्याला पोहचले आहेत. तेथे कक्ष स्थापन करून मदत पोहचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, सिंधूदुर्ग, रायगड, रत्नागिरी, गडचिरोली, मुंबई याठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. हवामान खात्याने पुढील 5 दिवसांसाठी ज्या ठिकाणीं रेड अलर्ट आहे तिथ ऑरेंज अलर्ट सांगितला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाउस जास्त पडत आहे. काही ठिकाणी शाळांना सुट्ट्या दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मदत व बाचाव कार्यासाठी मोठ्या क्षमतेचे हेलिकॉप्टर पंजाबहून मागितले आहेत. इथं धो धो पाउस पडतोय. त्यामुळे मशिन उचलून नेणे शक्य नाही. त्यामुळं 2 हेलिकॉप्टरची व्यवस्था करत आहोत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

मुंबईत 2 हेलिकॉप्टर तयार ठेवले आहेत. पुणे, सातारा, कोल्हापुर, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी याठिकाणच्या कलेक्टरसोबत सातत्यानं संपर्कात आहे, असंही अजित पवार यांनी सांगितले.

Tags:    

Similar News