Mumbai rainfall live updates : मुंबई-ठाण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर रायगड, पालघरला रेड अलर्ट

Update: 2023-07-19 10:20 GMT
Mumbai rainfall live updates : मुंबई-ठाण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर रायगड, पालघरला रेड अलर्ट
  • whatsapp icon

भारतीय हवामाना विभागानं मुंबई सह उपनगरांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बुधवारी सकाळपासूनच मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडतोय. मुंबई शहरासह काही उपनगरांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवलाय.

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्रानं मंगळवारीच मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यात बुधवारी काही ठिकाणी मुसळधार आणि अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. शेजारच्या रायगड आणि पालघर या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आलाय.

Tags:    

Similar News