पंधरा दिवसांत पेट्रोल, डिझेल तेरा वेळा इंधन महागलं

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य माणूस बेजार झाला असताना गेले पंधरा दिवसात सलग तेरा वेळा पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दराचा देशभरात भडका उडाला आहे. इंधनाची आतापर्यंतची ही वाढ 9.20 रुपयांवर गेली आहे.;

Update: 2022-04-05 02:45 GMT

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य माणूस बेजार झाला असताना गेले पंधरा दिवसात सलग तेरा वेळा पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दराचा देशभरात भडका उडाला आहे. इंधनाची आतापर्यंतची ही वाढ 9.20 रुपयांवर गेली आहे.

ANCHOR: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर दरवाढीचा भडका उडाला आहे. मागील 15 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली असून, आतापर्यंतची ही वाढ 9.20 रुपयांवर गेली आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरू आहे.

सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील 15 दिवसांत 13 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 8.40 रुपयांनी महागले आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 104.61 रुपये झाला असून, डिझेलचा दर 95.87 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर 85 पैसे वाढ करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 119.76 रुपये आणि डिझेलचा दर 103.92 रुपये आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 12 ते 25 रुपयांपर्यंत वाढ होईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

रशियाने युक्रेनवर पुकारलेल्या युद्धाचे चटके आता सगळ्यांनाच बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. खनिज तेलाचा भाव आता प्रतिबॅरल 110 डॉलरवर गेला आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. असे असतानाही उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर सुमारे चार महिने स्थिर होते. या निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात आता वाढ सुरू झाली आहे. याआधी सीएनजीचा दरात सातत्याने वाढ करण्यात आली असून, यानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचा नंबर लागला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. महागाईचा हा भस्मासूर आता सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील करून कुठे नेऊन ठेवेल हे सांगता येत नाही.

Tags:    

Similar News