रायगड जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद, मुरूडमध्ये सर्वाधिक १२४ मि.मी. पाऊस

Update: 2021-09-08 11:42 GMT

राज्यात गेले कही दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत रायगड मध्ये पुन्हा एकदा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.

जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेल्यामुळे रहदारीला अडथळा येतोय. मुरुड तालुक्यात घराघरात पाणी शिरले असुन बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. तर जुलै महिन्याखेरीस आलेल्या आपत्तीच्या पार्श्वभुमीवर महाड येथे एन डी आर एफ पथक तैनात करण्यात आलेय.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ३२.४७ मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. शिवाय गेल्या ३ महिन्यांमध्ये एकूण सरासरी ३१८०.७४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

कुठे किती पाऊस झाला?

गेल्या २४ तासांत मुरुडमध्ये सर्वाधिक १२४.०० मि.मी पावसाची नोंद झाली आहे. यानंतर श्रीवर्धन तालुक्यात १२२.०० मि.मी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय पनवेल- ७२.६० मि.मी., उरण-६५.०० मि.मी., कर्जत- २१.८० मि.मी., खालापूर- १५.०० मि.मी., महाड- ११.०० मि.मी., पोलादपूर-२१.०० मि.मी, म्हसळा- १५.०० मि.मी.,., माथेरान- ११.१० मि.मी. असे एकूण पर्जन्यमान ५१९.५० मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी ३२.४७ मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पावसाची टक्केवारी ९८.८९ टक्के इतकी आहे.

Tags:    

Similar News