महाराष्ट्रात कोरोना संकटाचा विस्फोट

कोरोनारुग्ण वाढीचा आज सर्वोच्च उच्चांक :४३ हजार १८३ नव्या रुग्णांची आज राज्यात नोंद:249 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

Update: 2021-04-01 10:45 GMT

देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या महाराष्ट्राला गेली दोन दिवसाच्या दिलाशानंतर पुन्हा एकदा कोरोना संकटाचा विस्फोट झाला आहे.आज पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने सर्वोच्च उसळी घेतली आहे.चोवीस तासात

४३ हजार १८३ नव्या रुग्णांची आज राज्यात नोंद तर 249 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंदीनं राज्यात पुन्हा चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

आज दिवसभरात राज्यात तब्बल 43,183 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर आज मृतांचा आकडासुद्धा वाढून राज्यात तब्बल 249 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.2 टक्के असून मृत्यूदर 1.92 टक्क्यांवर पोहोचलाय. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 28,56,163 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 24,33,368 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईला कोरोनाचा विळखा

मुंबई जिल्ह्यात बाधितांचा आकडा 42,23,419 वर पोहोचला आहे. मुंबईत एकूण 3,559,44 रुग्ण बरे झाले असून येथे आतापर्यंत 11,708 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई जिल्ह्यात सध्या 54,804 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे.

ठाण्यात आतापर्यंत 5,980 जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातसुद्धा कोरोना रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. येथे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास प्रशासनाला यश येत नाहीये. ठाण्यात बाधितांचा आकडा 3,45,384 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत येथे 2,96,944 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 5980 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून सध्या येथे 42,151सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पुण्यात तब्बल 64,599 रुग्णांवर उपचार सुरु

पुणे जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती तर अतिशय विदारक आहे. येथे सध्या 64,599 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 8,343 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात बाधितांचा आकडा 5,287 वर पोहोचला असून येथे आतापर्यंत 4,71,296 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबई शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला

मुंबई शहरात आज दिवसभरात 8,646 संशयितांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. येथे दिवसभरात 3,130 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज दिवसभरात मुंबईत 18 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 4,23,419 वर पोहोचला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 3,55,944 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 54,807 सक्रिय कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून येथे आतापर्यंत 11,708 जणांचा मृत्यू झाला आहे.

टास्कफोर्सच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीमध्ये राज्यव्यापी लॉकडाऊनडच्या तयारीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

परंतु कडक लॉकडाऊन असावा अशी अपेक्षा मोठ्या संख्येने राजकीय पक्ष आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे त्यामुळे राज्य सरकार देखील आता संभ्रमावस्थेत आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन जरी लावला नाही तरी गर्दीच्या ठिकाणावर कठोर निर्बंध लावण्याचे संकेत दिले आहेत.

लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नसून कोरोना चाचणी, कोरोना प्रतिंबधक उपाय पाळण्यावर सरकारने जोर द्यावा अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. त्यामुळे कोरोनाला थोपवण्यासाठी ठाकरे सरकार आगामी काळात कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags:    

Similar News