बंडखोर आमदारांना सहन करावे लागतेय नागपंचमीचे ट्रोलिंग...

Update: 2022-08-02 11:59 GMT

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सर्व बंडखोर शिवसेना आमदारांना `गद्दार` म्हणुन संभावना होत असताना आज नागपंचमीच्या मुहुर्तावर सर्व बंडखोर आमदारांना सोशल मिडीयावर ट्रोलिंग सुरु आहे...




 



सर्व बंडखोर आमदारांच्या सोशल मिडीया पेजवर हे आमदार आयत्या बिळावर नागोबा झाल्याची संभावना करण्यात आली आहे. एक करोड नाराज कार्यकर्त्यांच्या पेजवरुन यासंबधीचे आवाहन करण्यात आले होते.




 


सर्वपक्षीय नाराज कार्यकर्त्यांनो सामील व्हा. पक्षांतर केलेले, निष्ठावंत, विष्ठावंत, सतरंजीबहाद्दर, नाराज नसलेले या रे या... आपली "मन की भडास" येथे काढा !




 



 




त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्याचे प्रवक्ते दिपक केसरकर, आ. सुहास कांदे, दादा भुसे, संदीपान भुमरे, उदय सामंत यांचेही पेज शेअर करण्यात आले आहेत.. सुहास कांदे यांच्या पेजवर योगेश सावंत या युजरने मालकाने दिलेलं दूध पिऊन त्याच्यावरच फणा काढणाऱ्या नागालाही नागपंचमीच्या शुभेच्छा असं म्हटलं आहे.

डॉ. भार चव्हाण या युजने प्रत्येक बंडखोराला एक नाव दिले आहे.

गुलाब्या पाटील - टकल्या साप 😂

गर्दुल सुतार - हिरवा साप

संदीपपांदण डुंमरे - काळा साप

संतूर बांगर - केसाळ साप

खेकडा सावंत - ठेंगना साप

शाजी बापू - गुवाटीतला साप

केसटरकर - दुतोंडी गांडमांडूळ साप

थ्रिरीट चोमय्या - तोत्रा साप

बुलाजी कल्याणकारी - लाजाळू साप





 


नागपंचमी निमित्त आज सापांच्या प्रजाती शोधून काढा कॉमेंटमध्ये कळवा

#दिभाग्रज असं कळविण्यत आले आहे.




 


एकंदरीत नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्यानं बंडखोर आमदारांमधे अस्वस्थता आहे. शिवसेना युवानेते आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यांमुळे बंडखोरांचे धाबे दणाणले आहेत. मतदारसंघातही शिवसैनिक संतापले आहेत. त्यातच आता नागपंचमीच्या मुहुर्तावर सोशलमिडीय ट्रोलिंग झाल्यानं कुणाचा झेंडा आता धरु हाती अशी भावना बंडखोर आमदारांची झाली आहे.

Tags:    

Similar News