Reserve Bank Of India : पेटीएम बँकेसाठी(Paytm Bank) मोठी घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेने केली असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये पेटीएम पेमेंट्स बँकेला(Paytm Payments Bank) नविन ग्राहक(New Custormers) जोडण्यास प्रतिबंध लावला आहे. 31 जानेवारी रोजी आरबीआयने (RBI) हे आदेश जारी केले आहेत. त्याबरोबरच 29 फेब्रुवारीच्या नंतर सध्या असलेल्या ग्राहकांना बँकेत ठेवी जमा करण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे.
यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसारीत केलेल्या माहितीनुसार, सिस्टीम ऑडिट रिपोर्ट(System Audit Report), तसेच त्यानंतरच्या काही रिपोर्टमध्ये कंपनीने नियमितपणे आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, अशी बाब समोर आली आहे. तसेच पेटीएम बँकेशी संबधित आणखी काही बाबी समोर आल्या असून भविष्यात आणखी काही आवश्यक त्या कारवाई करण्यात येणार असल्याचेही आरबीआयने कळवले आहे.
पेटीएम बँकेत सामील असलेल्या ग्राहकांवर कोणते परिणाम होणार ?
यासंदर्भात आरबीआयने असं स्पष्ट केलं आहे की, 29 फेब्रुवारी 2024 च्या नंतर कोणत्याही ग्राहकांच्या खात्यांमध्ये वॉलेट्स, FASTags, NCMC कार्ड्स इत्यादींमध्ये रक्कम जमा करणे, प्रीपेड सेवा, टॉप अप करणे, क्रेडिट व्यवहार करता येणार नाही. मात्र, व्याज जमा होणे, कॅशबॅक किंवा इतर बाबींवरील परतावा ग्राहकांच्या खात्यात जमा होईल
यापूर्वीही पेटीएम बँकेवर आरबीआयने केली होती कारवाई
यापूर्वीही आरबीआयने पेटीएम वप कारवाई केली होती त्यामूळे ही काही कारवाईची पहीली वेळ नाही. केवायसीच्या नियमांचं उल्लंघन केल्याने रिझर्व्ह बँकेने मागच्या तीन महिन्यापूर्वीच पेटीएम(Paytm) ला मोठा दंड ठोठावला होता. आरबीआय ने पेटीएम पेमेंट्स बँकेला 5.39 कोटी रुपयांचा दंड सुनावाला होता. तसेच 2021 मध्येही 1 कोटी रुपयांचा दंड आकारला होता, त्यावेळी सुध्दा पेटीएमने काही नियमांचं उल्लंघन केलं होतं.