नोटांवरील गांधीचा फोटो बदलणार का? रिजर्व बॅंकेकडून मोठा खुलासा
सोशल मिडीयाच्या (social media)माध्यमातून फेकन्यूजचा (fakenews) प्रसार वाऱ्यासारखा होता. हा प्रश्न आर्थिक बाबी आणि पैशांशी संबधित असतो त्यावेळी आपले अधिक लक्ष लागते. राष्ट्रपिता महात्मा गांधीचा (mahatma gandhi) रिजर्व बॅंकेच्या (Reserve Bank) चलनावरील फोटो बदलणार अशा अनेक बातम्याचं खंडन देशातील सर्वोच्च रिजर्व बॅंकेने करत मोठा खुलासा केला आहे.;
सोशल मिडीयाच्या (social media)माध्यमातून फेकन्यूजचा (fakenews) प्रसार वाऱ्यासारखा होता. हा प्रश्न आर्थिक बाबी आणि पैशांशी संबधित असतो त्यावेळी आपले अधिक लक्ष लागते. राष्ट्रपिता महात्मा गांधीचा (mahatma gandhi) रिजर्व बॅंकेच्या (Reserve Bank) चलनावरील फोटो बदलणार अशा अनेक बातम्याचं खंडन देशातील सर्वोच्च रिजर्व बॅंकेने करत मोठा खुलासा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये अशा बातम्या येत आहेत की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नोटांवर महात्मा गांधींच्या जागी आणखी काही लोकांचे फोटो लावणार आहेत. आता या संदर्भात मध्यवर्ती बँकेने असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. सध्या भारतीय चलन किंवा नोटेवर फक्त गांधीजींचे चित्र छापले जात होते.
काय होता सोशल मिडीयातील संभ्रम?
वास्तविक, गेल्या अनेक दिवसांपासून अशा बातम्या येत होत्या, नोटेवर छापलेल्या चित्रांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दोन महापुरुषांना स्थान देण्याचा विचार करत आहे. भारतीय चलनात महात्मा गांधी नसून मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि रवींद्र नाथ टागो यांची प्रतिमा असेल, असा अहवालात असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. आता मध्यवर्ती बँकेने हे अहवाल खोटे म्हटले आहे. आता आरबीआयने याबाबत खुलासा केला आहे. आरबीआयने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
भारतीय चलन नोटांमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसून, महात्मा गांधींच्या ऐवजी कोणाचाही फोटो वापरण्यात येणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. वित्त मंत्रालय आणि आरबीआय भारतीय नोटांवर टागोर आणि कलाम यांचे फोटो वापरणार असून त्यांच्य छायाचित्रांचे नमुन्याचे दोन संच आयआयटी दिल्लीचे एमेरिटस प्रोफेसर दिलीप टी शहानी यांना पाठवण्यात आले आहेत. उच्चस्तरीय बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता आरबीआयच्या स्पष्टीकरणानंतर भारतीय चलन नोटांवर महात्मा गांधींशिवाय इतर कोणाचाही फोटो वापरण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.