गरीबीतून वाट काढत रवींद्र बनला पीएसआय, जिल्हाभरातून कौतूकाचा वर्षाव

गरीबीतून वाट काढत रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळेचा रवींद्र कोलपटे याची पीएसआयपदी नियुक्ती झाली आहे.

Update: 2022-03-09 04:08 GMT

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा नुकताच निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथील रवींद्र कोलपटे याची पीएसआय पदी नियुक्ती झाली आहे. त्याचे जिल्हाभरात कौतूक केले जात आहे.

 संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे धनगरवाडी येथील रवींद्र बापू कोलपटे याने mpsc उल्लेखनिय यश संपादन केले आहे 8 मार्च 2022 रोजी mpsc ने जारी केलेल्या अंतरिम गुणवक्ता यादीत महाराष्ट्रात  78 व्या क्रमांकाने पोलीस उप निरीक्षकपदी निवड झाली असून त्याच्या या यशाने परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले असून नवीन भावी पिढीपुढे आदर्श निर्माण केला आहे अत्यंत कठीण परिस्थितीत 2018 पासून mpsc च्या अभ्यासाला सुरुवात करून  मार्च 2019 मध्ये पूर्व परीक्षा व जुलै 2019मध्ये मुख्य परीक्षा देऊन यश संपादन केले आहे.




 


जिद्द चिकाटी ध्येय समोर ठेऊन यश संपादन करता येते हे रवींद्र याने दाखवून दिले मोलमजुरी करणारी आईवडील मोठा भाऊ व वहिनी यांच्याकडून खंबीर साथ शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच मी या पदापर्यंत पोहचू शकलो त्याच्या यशाने आई वडिलांचे स्वप्न साकार झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद  फुलला आहे.आपल्या यशासमोर पोलीस विभागाचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचा करारीपणा, प्रामाणिकपणा त्यांच्यातील धाडसी हजरजबाबीपणा याला नेहमीच आदर्श मानले आहे. अत्यंत गरीब कुटुंबात वाढलेल्या रवींद्रला समाजातील हलअपेष्टांची पूर्ण जाणीव असून ही जाणीव त्याला भेडसावत होती. तर कोकणविभागामध्ये स्पर्धा परीक्षांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असून मार्गदर्शनाची कमतरता कारण असून भविष्यात mpsc साठी अभ्यास मार्गदर्शन करायला आवडेल, असे मत रवींद्र कोलपटे यांनी व्यक्त केले. कोकणातील तरुणांनी पोलीस खात्यात भरती होऊन देशाची सेवा करण्यासाठी सज्ज रहा असे भावनिक साद घातली आहे.




 


Tags:    

Similar News