ST Worker protest: स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व ताकदीनिशी रस्त्यावर उतरेल: रविकांत तुपकर
संपूर्ण राज्यभरात एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. एसटी कर्मचारी महामंडळाचं विलिनीकरण करण्यासाठी आयोग निर्माण करा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जो पगार आहे. तोच एसटी कर्मचाऱ्यांना लागू करा. अशा मागण्या करत आहे.
मात्र, सरकारने यासाठी तीन आठवड्याचा कालावधी मागितला आहे. आजपर्यंत 37 आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळं सरकारने तात्काळ यावर निर्णय घेण्याची मागणी केली जात असताना या संपाला पाठींबा देण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांसह राजकीय पक्ष पुढे आले आहेत.
आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. ते म्हणाले
तुमची परिस्थिती मला माहित आहे,दिवाळीला तुमची मुलं तुम्हाला काही मागत नसतील .सामान्य प्रवाशी एक दिवस जर एसटी ने पुण्याला जाऊन आला तर चार दिवस घरी येऊन झोपतो. त्यामूळे तुमचे मनके बी ठिकाणावर राहिले. नसतील,एव्हढ्या खडतर परिस्थितीत घर चालवतो, बायको ला आपली परिस्थिती पहावत नाही,आई वडीलांना ही परिस्थिती पहावत नाही. त्याच्यामुळे सरकारने या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा आणि या कर्मचाऱ्यांचा संप सोडवावा नाहीतर तुमच्याबरोबर प्रवासी सुद्धा रस्त्यावर उतरतील. अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलडाणा येथे सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भेट दिल्यानंतर मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना दिली आहे.