रविकांत तुपकर यांना अटक ; आक्रमक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच

रविकांत तुपकर यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नीने मलकापुरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. अॅड. शर्वरी तुपकरांसह मलकापूर रेल्वे स्टेशनवर कापूस सोयाबीन भाव वाढीसाठी असंख्य शेतकरी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Update: 2024-01-19 03:50 GMT

सोयाबीन कापसाच्या मुद्द्यावर रविकांत तुपकर यांनी मलकापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलनाचा सरकारला इशारा दिला होता. मात्र, तत्पूर्वीच बुलढाणा पोलिसांकडून रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यासोबतचं पोलिसांनी १५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.




रविकांत तुपकर यांनी आंदोलन होणार म्हणजे होणारच असा पवित्रा घेतल्यानंतर तुरुंगात असताना देखील त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करीत मलकापूर रेल्वे स्टेशनवर दाखल झाले होते. या आदोलनाला असंख्य शेतकरी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता त्यांना रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांकडून अडविण्यात आले.यावेळी त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केलीं

कापूस आणि सोयाबीन दराच्या संदर्भात शेतकरी आक्रमक झाले आहेत. रविकांत तुपकर यांनी या अगोदर २ आंदोलनं केली होती. लवकारात लवकर कापूस आणि सोयाबीन दराचा निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करू असा थेट इशारा सरकारला दिला होता.




 Full View



Tags:    

Similar News