गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे रास्ता रोको आंदोलन
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केले होतं. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीती (अजित पवार) गटाने बारामती तालुक्यातील डोरलेवाडी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं आहे. बारामती वालचंद नगर रस्त्यावर रास्ता रोको करून गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यात आला आहे त्याचबरोबर पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. रास्ता रोको केल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.