रश्मी शुक्लांनी परवानगी न घेताच फोन टॅपिंग केले - राष्ट्रवादी

सध्या राज्याचे राजकारण फोन टॅपिंगमुळं तापले आहे. यासंदर्भात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात आता राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Update: 2021-03-25 03:07 GMT

पोलीस दलात बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यानंतर फोन टॅपिंग प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलपे आहे. अनेक अधिकाऱ्यांचे फोन टॅपिंगचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे. याचे पडसाद बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फोन टॅपिंगवरून भाजप आणि वरीष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर टीका केली आणि कारवाईचे संकेतही दिले.

"रश्मी शुक्ला यांच्या अहवालानमुळे त्याच फक्त एक स्वच्छ अधिकारी आहेत आणि बाकीचे सर्वच भ्रष्ट आहेत, असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा सरळ सरळ केलेला पोलीस खात्याचा अपमान आहे. शुक्ला यांनी नाव घेतलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी सरकारचा सल्ला घेऊन त्यांच्याविरोधात कोर्टात जावे, असे आवाहनही आव्हाड यांनी केले आहे. शुक्ला यांनी अजून किती जणांचे फोन टॅपिंगला लावले होते?" असं देखील आव्हाड म्हटले आहे.

फोन टॅप करायचा असेल तर गृहखात्याच्या अतिरिक्त सचिवांची परवानगी घ्यावी लागते, पण रश्मी शुक्ला यांनी तशी परवानगी घेतली नसल्याचं सीताराम कुंटेंनी सांगितले आहे. जेव्हा त्यांनी लिहिलेलं पत्र उघड झालं, तेव्हा त्यांनी माफी मागितली होती, आता जे फोन टॅपिंग चर्चेत आहे त्याबद्दलही शुक्ला यांनी माफी मागितली होती आणि सरकारने सौम्य भूमिका घेतली, पण तेच पत्र वापरून आता फडणवीस महाराष्ट्र सरकारची बदनामी करत आहेत अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.

Tags:    

Similar News