पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला

Update: 2024-01-05 04:45 GMT

Mumbai - आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला ( IPS Rashmi shukla ) यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गृह खात्याने त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. विवेक फणसळकर यांच्याकडून आता रश्मी शुक्ला पदभार स्वीकारतील.

रजनीश सेठ ( IPS Rajnish Seth) यांच्या निवृत्तीनंतर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याकडे महासंचालक पदाची धुरा सोपवण्यात आली आहे . रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत. शुक्ला या येत्या जून महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. सध्या त्या सशस्त्र सीमा दलाच्या प्रमुख म्हणून कार्यभार संभाळत होत्या

रश्मी शुक्ला यांच्यावर होता फोन टॅपींग प्रकरणाचा आरोप

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या आणि या प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Tags:    

Similar News