रानडे इन्स्टिट्यूटचे स्थलांतर होऊ देणार नाही - उदय सामंत
रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराबाबत मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली आहे.रानडे इन्सिट्युटचे स्थलांतर होऊ देणार नसल्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे;
रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराबाबत मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान रानडे इन्स्टिट्यूट केवळ राज्यातीलच नाही, तर देशातील पत्रकारिता करणाऱ्या प्रत्येकासाठीची महत्वाची संस्था आहे. त्यामुळे रानडे इन्स्टिट्यूट दुसरीकडे स्थलांतर करून कोणी बिल्डरला जागा देण्यासाठी कोणी प्रयत्न करणार असेल तर तो प्रयत्न मी मंत्री म्हणून हाणून पाडेल असं राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. ते बीड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. यावेळी रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराबाबत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला सामंत यांनी उत्तर देतांना रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतर होऊ देणार आणि असं सांगताना मी उद्या रानडे इन्सिट्युटला भेट देणार असल्याचं सांगितलं.
देशातील एवढ्या मोठ्या संस्थेची जागा कोणी बळकवण्याचा प्रयत्न करत असेल तर मी ते होऊ देणार नाही असं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.