रामोजी राव फिल्म सिटीचे संस्थापक Ramoji Rao यांचे निधन

रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव (Ramoji Rao) यांचे आज पहाटे निधन.;

Update: 2024-06-08 04:25 GMT

रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव (Ramoji Rao) यांचे आज पहाटे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांचे पार्थिव रामोजी फिल्म सिटी जवळील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

रामोजी राव यांचे मुळ नाव चेरुकुरी रामोजी राव होते. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३६ ला झळा होता.रामोजी राव (Ramoji Rao) यांनी चित्रपट आणि व्यवसाय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. जगातला सर्वात मोठा रामोजी फिल्म सिटी ( ramoji film city ) हा स्टुडीओ उभारला. त्यांचे स्वतःचे रामोजी राव हे फिल्म प्रॉडक्शन( Ramoji Film Production) देखील होते. ज्यातून अनेक सुपरहिट तेलगु चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती. ईटीव्ही नेटवर्क( E Tv) आणि ईनाडू तेलगु हा माध्यम ग्रुप सुरु करून माध्यम क्षेत्रात देखील त्यांनी यशस्वी कामगिरी केली. . ईटीव्ही नेटवर्कच्या माध्यमातून देशभरात अनेक तज्ज्ञ पत्रकार तयार झाले. हजारो बहुजन पत्रकारांना त्यांनी मुख्य प्रवाहात स्थान दिले. भारतीय पत्रकारितेला त्यांनी नवा आयाम दिला. डॉल्फिन हॉटेल, मार्गदर्शी चीटफंड असे उद्योग देखील त्यांनी उभारले.

रामोजी राव यांची संपती ४१,७०६ करोड इतकी होती. त्यांनी फिल्म प्रॉडक्शन व्यवसाय १९८४ ला उभारला. त्यांनी प्रतिघात, थोडा तुम बदलो थोडा हम, यांसारखे चित्रपट बनवले. २०१६ या वर्षी पद्म विभूषण( padm vibhushan) पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांचे लाँचिंग देखील त्यांनी केले होते.

रामोजी राव यांच्या पश्चात त्यांची पत्नी रमादेवी, एक मुलगा असा परिवार आहे. रामोजी राव यांच्या जाण्याने तब्बल आठ दशके चित्रपट क्षेत्रावर प्रभाव टाकणाऱ्या योगदान देणाऱ्या व्यक्तीची कमी भासणार आहे.

Tags:    

Similar News