Ramdev Baba | पतंजलीच्या नावाखाली दिशाभूल करणाऱ्या रामदेव बाबाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं...!
पतंजलीच्या आडून देशातल्या जनतेची दिशाभूल करण्याप्रकरणी रामदेव बाबा आणि पतंजली आयुर्वेदाचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांना सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत खडे बोल सुनावले.
योग गुरू म्हणून सर्वपरिचित असणारे रामदेवबाबा आणि पतंजली आयुर्वेदाचे व्यवस्थापकाचे संचालक बालकृष्ण आचार्य यांना पतंजलीच्या नावाखाली सामान्य जनतेची दिशाभूल करण्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात खडे बोल सुनावले आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात त्यांची याप्रकरणी सुनावनी होती, यावेली ते न्यायालयात हजर झाले होते. आपल्यावर केलेल्या आरोपांबद्दल आपली बाजू मांडण्यासाठी रामदेव बाबा यांच्याकडे भक्कम पुरावे किंवा त्याविषयी संदर्भ नसल्यामुळे, यावेळी रामदेव बाबा यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली.
पण केवळ माफी मागून पुरेसे नाही असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं त्यांना फटकारलं. त्याचबरोबर न्यायालयाचे गांभिर्याने घ्या असं म्हणत तुम्ही देशाची सेवा करण्याचं कारण सांगू नका, सर्वोच्च न्यायालय असो किंवा देशातलं कोणतंही न्यायालय असो, आदेशाचं करायलाच हवं, अशा शब्दात न्यायालयानं रामदेव बाबा यांना खडे बोल सुनावले.
दरम्यान, रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या दोन सदस्यीय पीठासमोर ही सुनावणी झाली. रामदेव बाबा यांच्या वतीने बलबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं, यावर न्यायालयानं सांगितलं की, आम्ही कंपनी आणि कंपनीचे व्यपस्थापकीय संचालक अशा दोघांनाही उत्तर देण्यास सांगितलं होतं, ते दिलं नाही यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली होती आणि तु्म्ही फक्त एकाच व्यक्तीचं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे, यावरही न्यायालयानं रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांना चांगलंच धारेवर धरलं.