रामदेवबाबांच्या पतंजलीला कोरोनाचा झटका; डेअरी प्रमुखाचा झाला मृत्यू

Update: 2021-05-24 14:30 GMT

सतत वादग्रस्त वक्तव्य करून पतंलजलीच्या कोरोनावरील  औषधाचा दावा करुन वाद ओढवून रामदेव बाबांच्या पतंजलीच्या डेअर व्यवसायाचे प्रमुख सुनील बन्सल (वय 57) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहेत.

बन्सल डेअरी सायन्सेसमधील तज्ञ होते. त्यांनी 2018 मध्ये पतंजलीच्या डेअरी व्यवसायाची धुरा हाती घेतली होती. त्यावेळी कंपनीने गाईचे पॅकेज्ड दूध, दही, ताक आणि चीजसह इतर दुग्ध उत्पादने बाजारात आणण्याची घोषणा केली होती. बन्सल यांच्या मागील आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांची फुफ्फुसे निकाली झाली होती. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. बन्सल हे काही दिवस ईसीएमओवर होते. ईसीएमओ म्हणजे एक्स्ट्राकॉर्पोरल मेंम्ब्रेन ऑक्सिजनेशन मशिन होय. ही मशिन रुग्णाच्या हृदय आणि फुफ्फुसे बंद पडल्यानंतर त्यांचे कार्य करते.

दरम्यान, योगगुरू रामदेवबाबा पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. व्हॅाट्स अॅपरील एका मेसेज वाचून दाखवताना त्यांनी अॅलोपॅथी उपचार पध्दतीला फालतू म्हटले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॅा. हर्षवर्धन यांनीही त्यावर नाराजी व्यक्त करत खरमरीत पत्र लिहिलं आहे. यामुळे अखेर रामदेवबाबांनी माफीही मागितली आहे.  एकंदरीतच़ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आवाहन करुनही उजव्या विचारसरणीच्या संघटना आणि भाजप मात्र विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारायला तयार नाही जीवघेणेया कोरोनाच्या संकटातही अवैज्ञानिक गोष्टींना प्रोत्साहन देत लोकांच्या जीवावर उठणार्‍या पद्धती आणि वक्तव्यांचा सर्वसामान्यांमध्ये तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

Tags:    

Similar News