तेव्हा त्यांचं शहाणपण कुठे गेलेलं? रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका..

तेव्हा त्यांचं शहाणपण कुठे गेले होतं? असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना उत्तर देण्यासाठी आम्ही सभा आयोजित करतोय असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलंय. नक्की काय म्हणाले आहेत रामदास कदम पाहुयात..;

Update: 2023-03-19 03:28 GMT


राज्याच्या राजकारणात दररोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत पडलेली फुट व त्यानंतर निर्माण झालेले दोन गट यामध्ये वारंवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीका केली जाते तर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांना लक्ष केले जात आहे. मागच्या काही दिवसांपूर्वीच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खेड मध्ये जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीका केली. आता ज्या ठिकाणी, ज्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा झाली त्याच मैदानावर एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेपूर्वीच शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

तेव्हा त्यांचं शहाणपण कुठे गेलेलं?

उद्धव ठाकरे यांना उत्तर देण्यासाठी खेडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेपूर्वी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटला आहे की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या अडीच वर्षात ते घराबाहेर पडले नाहीत. त्यावेळी बळीराजा कुठे गेला होता? मुख्यमंत्री होते त्यावेळी या बळीराजासाठी त्यांनी एकही निर्णय घेतला नाही. तेव्हा त्यांचं शान पण कुठे गेलं होतं? उद्धव ठाकरे या ठिकाणी सभा घेण्यासाठी अफजलखाना सारखे संपूर्ण महाराष्ट्रातून लोक घेऊन आले आता त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही सभा घेतोय. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे बळीराजासाठी निर्णय घेत आहेत आणि त्यांचे मंत्रिमंडळ राज्याच्या हिताचेच निर्णय घेत असल्याचं कदम यांनी म्हटलं आहे.

योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा उद्धव ठाकरे यांनी विडा उचलला होता..

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणून त्यांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा उद्धव ठाकरे यांनी विडा उचलला होता. मातोश्रीवर मला संपवण्यासाठी संजय कदम यांनी तीन वेळा बोलावलं होतं, मात्र माझ्या दबावामुळे त्यांना हे शक्य झालं नाही. कोकण हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे हे सांगण्यासाठी आम्ही ही सभा आयोजित केली आहे आणि ही सभा ऐतिहासिक सभा होणार असल्याचं कदम यांनी म्हंटले आहे.

Tags:    

Similar News