अयोध्या: राम मंदिर जमीन खरेदी, भाजप महापौराच्या पुतण्याने खरंच कोट्यावधी रुपये कमावले का?

अयोध्या येथील राम मंदिर जमीन वादात भाजपचा थेट हात आहे का? भाजप महापौराच्या पुतण्याने लाख रुपयाची जमीन राम मंदिर ट्रस्टला करोडो रुपयांना कशी विकली वाचा... Ram janmbhoomi trust land deal gets embroiled in controversies opposition alleges another scam involving ayodhya bjp mayor nephew aap sanjay singh revelation;

Update: 2021-06-20 12:25 GMT

सध्या उत्तर प्रदेशमधल्या अयोध्या येथील राम मंदिर ट्रस्टकडून खरेदी केलेल्या जमीन प्रकरणात आणखी एक खुलासा समोर आला आहे. अयोध्याचे महापौर ऋषिकेश उपाध्याय यांचा पुतण्या दीप नारायण उपाध्याय यांनी राम मंदिर ट्रस्टला 20 लाख रुपयांची जमीन अडीच कोटी रुपयाला विकली आहे. तसेच त्याच दिवशी दुसरी एक जमीन जी 27 लाख रुपयांना विकत घेतली होती ती 1 कोटी रुपयात राम मंदिर ट्रस्टला विकली. या जमीन खरेदी-विक्री प्रकरणात राम मंदिर ट्रस्टकडून अनिल मिश्रा नामक व्यक्ती साक्षीदार होते.

या प्रकरणावरून विरोधकांनी भाजपसह संघावर चांगलाच निशाणा साधला आहे. तर भाजपाकडून या आरोपांचे खंडण केलं जात आहे.

काय आहे प्रकरण?

अयोध्याचे महापौर यांच्या भाच्याने 20 लाख रुपयात जी जमीन खरेदी केली होती. ती जमीन राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट ला अडीच करोड रुपयात विकली गेली. तर दुसरी जमीन ज्याला 27 लाख रुपयात खरेदी केली होती. ती जमीनसुद्धा महापौर यांच्या पुतण्याने एक कोटीला विकली.

या खरेदी-विक्री संदर्भात आम आदमी पार्टी चे नेता संजय सिंह यांनी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

तीन महीन्यांपूर्वी जमीन 20 लाख रुपयांना खरेदी केली आणि अडीच कोटी रुपयांना विकली... अयोध्यातील भाजपचे महापौर उपाध्याय यांच्या पुतण्याने 20 फेब्रुवारीला 890 वर्ग मीटरची जमीन अयोध्याचे महंत देवेंद्र प्रसाद आचार्य कडून 20 लाख रुपयांना खरेदी केली होती. तेव्हा या जमीनीची किंमत सर्किल रेट च्या हिशोबाने 35.6 लाख रुपये होती. या जमीन खरेदी प्रकरणाचे कागदपत्रसमोर आले आहेत. त्यानुसार तीन महिन्यांनी दीप नारायण यांनी या जमीनीला राम मंदिर ट्रस्ट ला 2.5 कोटी रुपयाला विकली.

दीप नारायण यांनी आणखी एक 676 वर्ग मीटर ची जमीन त्याच दिवशी मंदिर ट्रस्टला एक कोटी रुपयला विकली होती. जेव्हा की या जमिनीची किंमत सर्किल रेट्च्या हिशोबाने 27 लाख रुपये इतकी होती. म्हणजे जी जमीन 4 हजार रुपये प्रति वर्ग मीटर दराने खरेदी केली होती. त्याला 14 हजार 774 रुपये प्रति वर्ग मीटर च्या दराने विकली गेली होती. यात विशेष बाब म्हणजे या डीलमध्ये ट्रस्टकडून अनिल मिश्रा हेच उपस्थित होते. जे राम जन्मभूमी ट्रस्ट च्या कथित पहिल्या जमीन खरेदीचे साक्षीदार होते.

या प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेता संजय सिंह यांनी भाजपवर निशाणा साधत ट्विटरवर लिहिलं की भाजप ने लोकांनी मंदिरासाठी दिलेला पैसा चोरला म्हणून राम मंदिर होत नाही. भाजप महापौराच्या पुतण्याने 20 लाखांची जमीन ट्रस्टला अडीच कोटीला विकली.

दरम्यान या प्रकरणी काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केलं आहे...

एकंदरित राम मंदिर जमीन खरेदी कथित घोटाळ्यात भाजप नेत्यांना विरोधक घेरताना दिसत आहेत.

Tags:    

Similar News