Rajya sabha update : राज्यातील महायुतीचे उमेदवार म्हणजेचं भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने आज उमेदवारीचे अर्ज भरले जाणार आहेत. दरम्यान महायुतीकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
राज्यसभेची निवडणूक येत्या २७ फेब्रुवारी रोजी होत आहे. महाराष्ट्रातून सहा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आज शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहे. अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सहा जागांसाठी महायुतीने पाच तर महाविकास आघाडीने एक उमेदवार जाहीर केला आहे.