सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर शस्त्रक्रिया ; लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार

Update: 2021-10-30 03:33 GMT

चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर काल शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर Carotid Artery revascularisation शस्त्रक्रिया पार पडली, जी मेंदूला रक्तपुरवठा पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया आहे. दरम्यान "त्यांची प्रकृती बरी होत आहे. त्यांना काही दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल", असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

रजनीकांत यांना चक्कर आल्याने, 28 ऑक्टोबरला संध्याकाळी त्यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना 'रुटिन चेकअप' साठी रुग्णालयात नेण्यात आलं अशी माहिती देण्यात आली होती. अभिनेता रजनीकांत दाखल असलेल्या रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जवळपास 30 पोलीस कर्मचारी रुग्णालयाबाहेर तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती मिळत आहे. तैनात करण्यात आलेल्या पोलीसांमध्ये तामिळनाडूचे विशेष पोलिसांच्या दोन तुकड्यांचा समावेश असून प्रत्येकी तुकडीत 10 पोलीस कर्मचारी आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, परिस्थिती नियंत्रणात राहण्यासीठी हा पोलीस बंदोबस्त रुग्णालयाच्याबाहेर तैनात करण्यात आला आहे. दरम्यान सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीस्थिरतेसाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.

Tags:    

Similar News