ईडीच्या अधिकाऱ्याचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करत थेट लखनऊमधून उमेदवारी

भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. त्यापार्श्वभुमीवर ईडीच्या अधिकाऱ्याने थेट भाजपमध्ये प्रवेश करत उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमधून उमेदवारी मिळवली आहे.

Update: 2022-02-03 07:23 GMT

भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. त्यापार्श्वभुमीवर ईडीच्या अधिकाऱ्याने थेट भाजपमध्ये प्रवेश करत उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमधून उमेदवारी मिळवली आहे.

पाच राज्यातील निवडणूकीत चांगलीच रंगत आली आहे. तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच काही नेत्यांची तिकीटे कापल्याने आणि काहींना अपेक्षित मतदारसंघ न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर पक्षांतर सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर केंद्रीय तपास यंत्रणेतील महत्वाची यंत्रणा असलेल्या ईडीच्या अधिकाऱ्याने ईडीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे. तर अनेक नवीन चेहरे निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावत आहेत. त्यामध्ये आत्तापर्यंत आयएस, आयपीएस अधिकारी राजीनामा देत राजकीय पक्षात प्रवेश करत होते. मात्र आता इडीच्या अधिकाऱ्याने राजीनामा देत निवडणूकीच्या मैदानात उडी घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जातो. त्यापार्श्वभुमीवर

अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) माजी अधिकारी राजेश्वर सिंह यांनी दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना केंद्र सरकारने स्वेच्छा निवृत्ती (VRS) दिली होती. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्याने भाजपमध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर आता राजेश्वर सिंह यांना उत्तरप्रदेशातील लखनऊमधील सरोजिनीनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपवर करण्यात येत असलेल्या आरोपात तथ्य आहे का? असा प्रश्न सामान्य लोकांमधून विचारला जात आहे. 

Tags:    

Similar News