पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर आता राजस्थानमध्येही संघर्ष सुरू झाला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ओएसडी लोकेश शर्मा यांनी शनिवारी रात्री उशिरा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना लोकेश शर्मा यांनी
मी केलेल्या ट्विटला राजकीय रंग देणे, त्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. पंजाबमधील घडामोडींशी जोडले जात आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी 'काँग्रेसच्या लहान अथवा मोठ्या नेत्याच्या संदर्भात काँग्रेस सरकारबद्दल कधीही भाष्य केलेले नाही.'' असं म्हटलं आहे.
लोकेश शर्मा यांचं ट्वीट
शनिवारी दुपारी 1.42 मिनिटांनी गेहलोत यांचे ओएसडी म्हणून मीडियाचे काम सांभाळत असलेले लोकेश शर्मा यांनी केलेले ट्वीटच त्यांच्यासाठी त्रासदायक ठरलं. लोकेश शर्मा यांनी ट्विट करताना
'मजबूत व्यक्तीला मजबूर, साध्या व्यक्तीला मगरूर केलं जात असेल, कुंपनच शेत खात असेल तर पिकाला कोण वाचवेल!!'
या आशयाचं ट्वीट केलं होतं. त्यांच्या या ट्वीट नंतर राज्यातील राजकारण तापले आहे. त्यांचे हे ट्विट कॉंग्रेस नेत्यांना टोमना मानला जात आहे.
लोकेश शर्मा यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री गहलोत यांच्याकडे सोपवला आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, गेहलोत यांनी स्वतः लोकेश शर्मा यांचा राजीनामा घेतला आहे.
पंजाब प्रमाणे राजस्थानमध्ये काही घडेल का?
दरम्यान लोकश यांच्या ट्वीटनंतर राजस्थानमधील परिस्थितीही पंजाबसारखीच होत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील भांडण कोणापासून लपलेले नाही.
2018 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद वाढला आहे. बऱ्याच वेळा ते सार्वजनिक ठिकाणी देखील पाहायला मिळालं आहे. पंजाबमधील सिद्धू (नवज्योतसिंग सिद्धू) प्रमाणेच, राजस्थानमधील पायलट कॅम्पने मुख्यमंत्री बदलण्यासाठी केंद्राकडे मागणी केली आहे. अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट वर टीकाही केली आहे.
गेहलोत आणि पायलट वारंवार वेगवेगळ्या गटांमध्ये दिल्लीला जाताना पाहायला मिळाले आहेत. त्याचबरोबर या संदर्भात माध्यमांमध्ये चर्चा ही होत असते. मात्र, पंजाब मधील मुख्यमंत्री बदलानंतर राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदल होणार का? असा सवाल निश्चितच उपलब्ध केला जात आहे.