खोटा इतिहास सांगून वातावरण बिघडवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न : प्रविण गायकवाड

संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांनी राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद येथील सभेत केलेल्या दाव्यांवरून टीका केली आहे.;

Update: 2022-05-02 13:45 GMT

सध्या राज्यात अस्वस्थ पसरली आहे. सध्या खोटा इतिहास सांगून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न राज ठाकरे करतं आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधली होती. लोकमान्य टिळकांनी जीर्णद्धार केला नाही. त्यांनी वर्गणी गोळा केली. आणि जीर्णोद्धार करणे बाजूला राहिला त्यांनी समाधी जवळ वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसवला आणि वाद घडवून आणला असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी केला आहे.

जेम्स लेन यांचं ओरिजनल पुस्तकं आणि बाबसाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं पुस्तक यातील शिवाजी महाराज जन्म आणि दादोजी कोंडदेव यांच्या बाबत केलेलं लिखाण सारखं आहे.... नंतर जे जेम्स लेन यांच्या पुस्तकाच्या कॉपी अलेली आहे त्यामध्ये मग दादोजी कोंडदेव यांच्याबाबत लिहिलेलं लिखाण का वगळल हा आमचा सवाल आहे.राज ठाकरे जातीयवादी राजकरण करत आहेत. राज ठाकरे यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे. राज ठाकरे यांना अटक करून शांतता प्रस्तापित करा. आम्हीं याप्रकरणी शरद पवार यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे खोटा इतिहास पसरवत आहेत, असंही प्रविण गायकवाड म्हणाले.


Tags:    

Similar News