ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळी मी सर्वात प्रथम बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड यांचा विकास झाला पाहिजे असं म्हणालो होतो. अशी माझी भूमिका होती. त्यानंतर 2019 मध्ये लावरे तो व्हिडिओ मधून राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली होती. या सगळ्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ''एखाद्या भूमिकेला विरोध करणं राजकारणात गैर नसतं.जर एखाद्या माणसाने चांगलं काम केलं तर त्याचे अभिनंदन करावं इतका मोठेपणा आणि मोकळेपणा तुमच्यात असला पाहिजे. 2019 नंतर झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये 370 कलम रद्द होणे, राम जन्मभूमीचा विषय मार्गी लागणं असा अनेक चांगल्या गोष्टी सरकारकडून झाल्या त्याचं मी अभिनंदन केलं. मी बैलासारखा मुतत माझा विचार करत नाही. मी जो विचार करतो तो सरळच विचार करतो.