भोंदू कालीचरणला अखेर अटक ; रायपूर पोलिसांची कारवाई

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भोंदू कालीचरणला अखेर अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून भोंदू कालीचरणला अटक केली;

Update: 2021-12-30 03:56 GMT

मुंबई//राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भोंदू कालीचरणला अखेर अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून भोंदू कालीचरणला अटक केली आहे. बगेश्वरी धामममधून पहाटे चार वाजता कालीचरणला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. कालीचरणला दुपारपर्यंत रायपूरला आणण्यात येणार आहे. टिकारपारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत त्यांना शिव्या दिल्याप्रकरणी धर्मसंसद वादात सापडली होती. भोंदू कालीचरणने या संसदेत केलेल्या भाषणादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर तीव्र पडसाद उमटले होते. कालीचरणच्या अटकेच्या मागणीने यावेळी जोर धरला होता, काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. रायपूर पोलिसांनी आपले दोन गट महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात कालीचरणच्या अटकेसाठी पाठवले होते

Tags:    

Similar News