भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाण्यात शिरले पावसाचे पाणी

Update: 2021-08-31 08:27 GMT

जालना : भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस स्टेशनला सध्या तलावाचे रूप प्राप्त झालं आहे. कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पारध पोलीस स्टेशनमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. हे पाणी काढण्यासाठी पोलिसांनी विद्युत पंप जोडला आहे.

बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पोलीस विभागाला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे. कार्यालयातच पावसाचे पाणी शिरल्याने पोलीस विभागाचे कामकाज काही काळ ठप्प झाले होते. जालना पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या प्रयत्नातून पारध पोलीस स्टेशनसाठी संरक्षक भिंत बांधण्याचे काम सध्या सुरू आहे , मात्र काम पूर्ण झाले नसल्याने पावसाचे पाणी थेट पोलीस स्टेशनमध्ये शिरले आहे.

कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पाहायला मिळाले. या पावसामुळे शहरातील सखल भागात देखील पाणी साचले आहे.

Tags:    

Similar News