पाऊस आला आणि सगळं काही बरबाद झालं

Update: 2023-09-23 12:53 GMT

खूप साऱ्या लोकांनी कर्ज काढून इथं बिझनेस स्थापन केला होता. पण ते सगळं बुडून गेलंय. सगळं काही नष्ट झालंय. आता आम्हाला काय अपेक्षा? प्रशासनाने आधी सांगितलेलं नाही, सगळं बरबाद झालंय, अशी प्रतिक्रीया अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागपूरमधील व्यावसायिकाने व्यक्त केलीय.

प्रशासनाने आम्हाला पाऊसासंदर्भात कुठलीहीच माहिती दिली. आधी काहीच सांगितलं नाही. त्याची जबाबदारी कोण घेणार. हे प्रशासनाचं अपयश आहे. त्यामुळे त्यांनी पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागपूरमधील व्यावसायिकांनी केली आहे.

अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो होईल, याचीही माहिती आम्हाला देण्यात आली नाही. आधीच या ठिकाणची कामं प्रलंबित आहेत. ही रखडलेली कामं आधीपासून निपटवले नाहीत. आमच्या सेक्रेटरींनी वारंवार पत्रव्यवहार केला. पण प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं. मागच्या शाळेची भींत पडलीय आणि त्यामुळेच हे सगळं पाणी थेट आमच्या दुकानात घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्रतिक्रीया नागपूरमधील व्यावसायिकांनी दिली.

आम्ही खरंच बरबाद झालोय. त्यामुळे प्रशासनाने आमच्या दुकानदारांना नुकसान भरपाई देऊन आधार द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

Tags:    

Similar News