विदर्भात पाऊसाचा अलर्ट तर गणेश उत्सवात शेवटच्या टप्प्यात पाऊसाची उघडीप...
राज्यात परतीच्या पाऊसाने वाट धरली असली तरी अनेक भागात परतीचा पाऊस शेतकऱ्यांना नुकसान कारक असणार आहे. राज्यात गणपती उत्सवाच्या ६ व्या दिवसापासून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे आणि उत्सवाच्या अखेरपर्यंत कमी राहील असा अंदाज हवामान विभागाने IMD ने वर्तवला आहे. मात्र विदर्भातील काही भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे.
आज 10 सप्टेंबर गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट हवामान विभागाने दीला आहे आहे आणि गोंदिया जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे. उद्या गोंदिया, नागपूर, भंडारा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. मुंबईमध्ये आज ९-१० मिमी मध्यम पावसाची शक्यता आहे, त्यानंतर पाऊस हलका/मध्यम होईल. पुण्याच्या घाट माथ्यावर यलो अलर्ट दीला आहे काही भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुणे शहरात पुढील ७२ तासांमध्ये हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे (विजांचा कडकडाट होण्याची शक्यता). १२ सप्टेंबरपासून पावसात घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दीला आहे...