ऑक्सिजन एक्सप्रेस वाचवणार रुग्णांचे प्राण, काय आहे सरकारचा मास्टर प्लान?

Update: 2021-04-18 16:56 GMT

रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आता रेल्वेच्या मदतीने मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडर देशभरात पोहोचवले जाणार आहेत. ऑक्सिजन एक्सप्रेस अधिक वेगाने जाण्यासाठी ग्रीन कॉरिडोरही तयार करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या लढाईत ऑक्सिजनची कमतरता हा मोठा प्रश्न आहे. ऑक्सिजनची कमतरता असल्यानं अनेक लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे केंद्र सरकारने मालगाडीच्या मोकळ्या बोगीवर ऑक्सिजनची वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईच्या बोइसरमध्ये याची पहिली चाचणी घेतली. इथं एका ऑक्सिजनने भरलेल्या टॅकरला रेल्वेच्या बोगीवर चढवलं. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे रेल्वेने ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी मागितली होती. त्यानंतर केंद्र सरकारने पूर्ण देशासाठी हा निर्णय घेतला आहे.

Tags:    

Similar News