रायगडचा शिवकालीन पूल मोजतोय अखेरची घटका, दुर्घटना घडण्याची नागरिकांना भिती
रायगड जिल्ह्यातील महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेनंतर संपूर्ण देश हादरला होता. या दुर्घटनेनंतर सरकारने राज्यातील सर्वच धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. पण आजही रायगड जिल्ह्यातील नागोठणे वरवठणे हा अंबा नदीवरील शिवकालीन पूल जीर्ण आणि धोकादायक स्थितीत आहे. या गावातील नागरिकांनी दुर्घटना घडण्याची भिती व्यक्त केली आहे. या परिसरातील नागरिकांची व्यथा जाणून घेतली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी….