धक्कादायक..! पोलिस दल कोरोनाच्या विळख्यात

ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभुमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे राज्य सरकारने कोरोना निर्बंध कडक केले होते. मात्र तरीही राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 30 हजारांच्या आत येत नाही. त्यामुळे प्रशासनासह नागरीकांचेही टेन्शन वाढले आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे रायगड जिल्ह्यातील पोलिस दल कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.;

Update: 2022-01-19 03:33 GMT

रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यापार्श्वभुमीवर पोलिस अधीक्षक अशोक दुधेसह 11 पोलिस अधिकाऱ्यांसह 104 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिकृतरित्या जाहीर केले आहे. त्यामुळे कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. त्यातच जनतेची सुरक्षा आणि जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, अशा पोलिस दलालाच कोरोनाचा विळखा पडला आहे. रायगड जिल्ह्यात पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांच्यासह 11 पोलिस अधिकारी आणि 104 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झआली आहे. त्यामुळे रायगड पोलिसांची चिंता वाढली आहे. मात्र या पार्श्वभुमीवर सर्वांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती रायगड जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. पोलिसदलात कोरोनाने एन्ट्री केल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. तकर पोलिस अधीक्षक कार्यालयासह अन्य पोलिस स्थानकांमध्येही पोलिसांची अँटीजन चाचणी करण्यात येत आहे.

पहिल्या लाटेतही रायगड जिल्ह्यातील 595 पोलिस कर्मचाऱ्यांना व त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेतही पोलिस दल कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने पोलिस प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Tags:    

Similar News