भाजपा जिल्हाप्रमुख राजेंद्र मस्के यांच्या व्हीआयपी पत्त्याच्या क्लब वर धाड ; 47 जुगारी ताब्यात
बीड : शिवसेना प्रमुख कुंडलिक खांडे यांचे प्रकरण ताजे असतानाच भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत काल रात्री त्यांच्या मालकीच्या जागेवर असलेल्या व्हीआयपी पत्त्याच्या क्लबवर आयपीएस पंकज कुमावत यांच्या विशेष पथकाने धाड टाकली यात तब्बल 47 व्हीआयपी आरोपींसह मोठा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आले आहे. दरम्यान अवैद्य धंद्यावरून शिवसेनेने कुंडलिक खांडे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली होती तशी आता भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करणार का? याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पक्षाचे नेते जर अवैध धंदे करत असतील तर इतरांचे काय? असा प्रश्न सध्या बीड जिल्ह्यातील नेत्यांच्या कारभारावरून उपस्थित होत आहे. गुटखा प्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा नोंद होण्याचा प्रकार ताजा असतानाच बीड जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष राजेंद्र मस्के अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या मालकीच्या जागेवर असलेल्या गेल्या अनेक महिन्यापासून व्हीआयपी पत्त्याचा क्लब सुरू होता.
याची माहिती आयपीएस पंकज कुमावत त्यांना मिळाली होती त्यानंतर त्यांनी काल रात्री उशिरा बीड तालुक्यातील चऱ्हाटा फाटा परिसरातील व्हीआयपी पत्त्याच्या क्लबवर धाड टाकली, यावेळी टीमने 47 व्हीआयपींना ताब्यात घेतले आहे. रात्री त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती ही जागा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीची असल्यामुळे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान आयपीएस पंकज कुमावत यांच्या राजकीय पुढाऱ्यांच्या अवैध धंद्यावर धाड धाडसी कारवाईने जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. मात्र, पक्ष श्रेष्ठी जिल्हाध्यक्षावर काही कार्यवाही करतील काय असे सर्वसामान्यातुन बोलले जात आहे.