आधीच ईडीच्या कचाट्यात सापडलेल्या शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ आणखी वाढहोण्याची शक्यता आहे. कारण जालन्याच्या बाजार समितीत धाड सत्र सुरू असून, आतापर्यंत 12 ठिकाणी धाड पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही कारवाई कोणत्या विभागाची आहे हे मात्र अजून समोर आलं नाही. विशेष म्हणजे जालना बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर आहेत.
गेल्या आठवड्यात भाजप नेते किरीट सोमय्यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत अर्जुन खोतकर यांनी साखर कारखान्यात मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. असे असताना आता बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या धाडसत्र पाहता अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
जालना बाजार समितीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. मात्र आता थेट धाडसत्र सुरू झाल्याने खोतकर यांच्या अडचणी वाढणार आहे.