राहुल गांधींची भारत जोडो 'आदिवासी न्याय' यात्रेनिमित्त लोकसभा प्रचाराचा नंदुरबार येथून सुभारंभ करणार..
काँग्रेस नेते राहुल गांधींची उद्यापासून महाराष्ट्रात भारत जोडो 'आदिवासी न्याय' यात्रा नंदुरबार येथून सुरू होणार आहे. यासाठी काँग्रेसचे अनेक बडे नेते नंदुरबार जिल्ह्यात येणार असून भारत जोडो यात्रेची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यापासून होणार आहे. नंदुरबार, दोंडाईचा, धुळे, मालेगाव, पिंपळगाव बसवंत,ओझर, नासिक असा प्रवास केल्यानंतर 17 मार्च ला या यात्रेचा समारोप मुंबईत भव्य सभेने होणार आहे.
यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात अमित देशमुख महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, खासदार के.सी.वेणूगोपाल, यांच्यासह अनेक नेते नंदुरबार जिल्ह्यात येणार असून भारत जोडो यात्रेची तयारी करणार आहेत.
राहुल गांधी हे लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर येत असल्यामुळे लोकसभेची प्रचाराची सुरुवात नंदुरबार पासून करणार असल्याच बोलले जातं आहे. आदीवासी समाज नेहमी काँग्रेसच्या बाजूने मतदान करत आला आहे. गेल्या काही वर्षांपासून दुरावालेला आदिवासी समाज पुन्हा काँग्रेस शी जोडला जावा यासाठी विशेष रानणिती काँग्रेसला आखावी लागणार आहे.आदिवासी मतदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी राहुल गांधी कोणत आश्वासन देतात याकडे पुढचं भविष्य ही अवलंबून आहे.