नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी आता संसदेच्या अधिवेशनात दिसणार आहेत. राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्याची ऑर्डरही काढण्यात आली आहे. मोदी आडनावा प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी बहाल होताच काँग्रेस कार्येकत्यांकडून जल्लोष साजरा कण्यात येत आहे.
लोकसभा सचिवलयाने आर्डर काढून राहुल गांधी यांना खासदारकी बहाल कण्यात आली दरम्यान या आर्डरमध्ये संपुर्ण घोषवारा देण्यात आला आले. २४ मार्च रोजी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आदेश देत या निर्णयाला स्थगिती देली. त्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आलं असल्याच नोटीसीमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान खासदारकी पुन्ही मिळाल्यानंतर आज राहुल गांधी लोकसभेच्या कामकाजात उपस्थित राहणार आहेत. उद्या होणाऱ्या लोकभेत सरकार अविश्वास ठरावात सहभागी होणार आहे. ८ ते १० ऑगस्ट पर्यंत ही चर्चा चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १० तारखेला यावर उत्तर देणार आहेत. त्यामुळे या चर्चेत राहुल गांधी हे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्याची शक्यता वर्तली जात आहे.