Rahul Gandhi Vacating Bungalow : राहुल गांधी यांनी बंगला खाली करण्यास केली सुरुवात
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांना दिल्लीतील 12 तुघलक बंगला खाली करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर देशभर काँग्रेस आक्रमक झाली होती. मात्र आता अखेर राहुल गांधी यांनी बंगला खाली करण्यास सुरुवात केली आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi on Modi) यांनी मोदी समाजाचा अपमान केल्याच्या आरोपात सुरत कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केली. तर त्यापाठोपाठ राहुल गांधी यांना दिल्लीतील 12 तुघलक रोडवरील बंगला (12 Tughlak lane bungalow of Rahul Gandhi) खाली करण्यास सांगितले होते. त्यानंतर देशभरात काँग्रेस (Congress) कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. मात्र आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul gandhi and Sonia Gandhi) आणि त्यांच्या आई सोनिया गांधी यांनी शुक्रवारी आपला बंगला खाली करण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना 30 दिवसांच्या आत बंगला खाली करण्यास सांगितले होते. त्यानुसार दोन ट्रक कर्टन्स आणि इतर साहित्य नेण्यात आले. राहुल गांधी यांच्या बंगल्यातील साहित्य त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ बंगल्यावर नेण्यात येत आहे. मात्र हे साहित्य हलवण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता सुरक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.