कोणत्याही सत्तेसाठी राहुल गांधी रस्त्यावर नाहीत. – यशोमती ठाकूर

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राहुल गांधी यांची सभा झाली. या सभेत यशोमती ठाकूर यांनी "काेणत्याही सत्तेसाठी राहुल गांधी रस्त्यावर नाहीत." असे विधान केल्यानंतर सभेतील लोकांना प्रश्न विचारला.;

Update: 2022-11-18 14:36 GMT

राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रे दरम्यान शेगाव येथे जाहीर सभा झाली. यावेळी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. या सभेत काँग्रेसचे नेते काय बोलतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आपल्या भाषणातून "राहुल गांधी कोणत्याही सत्तेसाठी रस्त्यावर उतरले नाहीत" असे विधान केले. त्यामुळे राहुल गांधी यांना तुम्ही साथ देणार का? असा प्रश्न यशोमती ठाकूर यांनी जनतेला विचारला तेव्हा सभेतील नागरिकांना सकारत्मकता दाखवली. तसेच ठाकूर यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवरती टीका केली. आपल्या परिसरात पाच राव आहेत. दोन राव संसदेत आहेत आणि एक राव नागपूरात बसलेला आहे, असं म्हणत बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, खासदार अनिल बोंडे आणि देवेंद्र फडणवीस त्या सगळ्यांना मुन्नाभाई प्रमाणे छप्पी देऊन घरी बसवायचे आहे.

तसेच यशोमती ठाकूर यांनी पदयात्रेतील अनुभव सांगितला. राहुल गांधी एका मंदिरात गेले असताना मी तेथील लोकांना विचारले की, आज राहुल गांधी तुमच्या गावातील मंदिरात आले आहेत कसं वाटतंय? तुम्हाला खर सांगा तेव्हा लोकांनी सांगितल की, एक निरागस व्यक्ती, स्वच्छ,खऱ्या अर्थाने पाहिल तर देवाचं रुप आहे. आणि हे रुप गजानन महाराज यांच्या पावन भूमित आले आहेत. तुम्ही राहुल गांधी यांना साथ देणार का? यशोमती ठाकूर यांच्या प्रश्नांवर पुन्हा सकारात्मक उत्तर लोकांनी दिले.पुढे बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, ज्या तामिळनाडूत आपल्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या त्याच भुमीतून राहूल गांधी शांततेचा संदेश घेवून निघाले आहेत.

Tags:    

Similar News