दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधींनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले…

Update: 2023-03-23 11:35 GMT

सर्व चोरांची आडनावे मोदीच का असतात? असं वादग्रस्त विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यामुळे राहुल गांधी चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणी सुरत कोर्टाने ( Surat Court) राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आली होती. त्यानंतर न्यायालयाने राहुल गांधींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणावर राहुल गांधींनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

2019च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांची कर्नाटकात मोठी रॅली होती. 13 एप्रिल 2019 रोजी कोलार येथे ही रॅली पार पडली. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं आडनाव एक सारखं कसे? सर्व चोरांची आडनावे मोदी का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता.

त्यावर भाजपचे आमदार पूर्णेश मोदी (PURNESH MODI MLA) यांनी आक्षेप घेत सुरत कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांच्या या विधानामुळे मोदी समुदायाचा अपमान झाला आहे. त्यांच्या विधानामुळे मोदी समुदायातील लोकांना मान खाली घालावी लागत आहे, असं पूर्णेश मोदी यांनी म्हटलं होतं.

राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता. त्यावर सुरत सेशन्स कोर्टानं निकाल दिला आहे. राहुल गांधी कोर्टात म्हणाले, कोणाच्या भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या वक्तव्यामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही. यावेळी राहुल गांधी यांनी कोर्टासमोर आपली बाजू मांडली. माझा हेतू चुकीचा नव्हता. मी जे बोललो ते केवळ एक राजकारणी म्हणून बोललो. मी नेहमीच देशातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत आला आहे,

असं राहुल गांधी यांनी कोर्टाला सांगितलं. राहुल गांधी यांच्या विधानाने कुणाचंही नुकसान झालेलं नाही. अशावेळी या प्रकरणात कमी शिक्षा सुनावली गेली पाहिजे, अशी विनंती राहुल गांधी यांच्या वकिलाने कोर्टाला केली होती. तर राहुल गांधी यांना कठोर शिक्षा सुनावली पाहिजे, तसेच त्यांना दंडही ठोठावला पाहिजे, अशी मागणी पूर्णेश मोदी यांच्या वकिलाने कोर्टाला केली होती. त्यानंतर हा निर्णय आला. राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा झाली. त्यांना जामीनही मिळाला. आता ते वरच्या न्यायालयात आव्हान देणार आहेत, असं त्यांच्या वकिलाने सांगितलं.

सत्य हे माझे ध्येय आहे आणि अहिंसा माझे साधन आहे

राहुल गांधींनी राष्ट्रपिता महत्मा गांधी यांचं एक वाक्य ट्वीट केलं आहे. “माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य हे माझे ध्येय आहे आणि अहिंसा माझे साधन आहे,” असं राहुल गांधींनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटल आहे

तर, प्रियंका गांधी-वाड्रा यांनीही ट्वीट करत केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. “घाबरलेलं सरकार साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण, माझा भाऊ कधी घाबरला आणि घाबरणारही नाही… सत्य बोलत आलो आणि सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज बुलंद करत राहू… करोडो देशवासीयांचं प्रेम राहुल गांधींच्या पाठीशी आहे,” असं प्रियंका गांधींनी ट्वीट करत म्हटलं.

Tags:    

Similar News