'...मग संघाच्या विचारधारेनं महात्मा गांधींना गोळ्या का घातल्या'- राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी महिला काँग्रेसच्या स्थापना दिनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी भाजपच्या हिंदुत्वावर एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करत निशाणा साधला आहे. राहुल गांधी यावेळी म्हणाले की,आज देशात आरएसएसवाल्या भाजपची सत्ता आहे. त्यांची आणि आमची विचारधारा वेगळी आहे. काँग्रेस कार्यकर्ता होण्याच्या नात्यानं मी अन्य विचारधारांसोबत तडजोड करु शकतो. मात्र, भाजप आणि संघाच्या विचारधारेशी कधीही नाही असं राहुल गांधी म्हणाले.
भाजपा-RSS और हमारी विचारधारा अलग है।
— Congress (@INCIndia) September 15, 2021
कांग्रेस का कार्यकर्ता होने के नाते मैं यह बात समझ सकता हूँ कि मैं बाक़ी विचारधाराओं के साथ कोई न कोई समझौता कर सकता हूँ, लेकिन मैं भाजपा और RSS की विचारधारा के साथ कभी भी समझौता नहीं कर सकता : श्री @rahulGandhi #MahilaCongressFoundationDay pic.twitter.com/wscSKJ2eDb
भाजप आणि संघाचे लोक सांगतात की भाजप एक हिंदुत्ववादी पक्ष आहे. मात्र, मागील शंभर-दोनशे वर्षात एका व्यक्तीने हिंदू धर्म समजून घेतला आणि त्यानुसार आपलं आचरण केलं. ती व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी. ही बाब आम्हीही मानतो आणि आरएसएस-भाजपचे लोकही मानतात. जर महात्मा गांधी यांनी हिंदू धर्म समजून घेत आपलं संपूर्ण आयुष्य तो समजून घेण्यात घालवलं. मग यांच्या संघाच्या विचारधारेच्या व्यक्तीने महात्मा गांधी यांच्या छातीत तीन गोळ्या का झाडल्या? असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.