राहुल आणि सोनिया गांधींना अटक होणार - सुब्रमण्यम स्वामी

कॉंग्रेस कार्यालय आणि सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला;

Update: 2022-08-04 04:06 GMT

नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात दिवसेंदिवस गांधी माता - पुत्राला धक्केच मिळत आहेत. बुधवारी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच EDने हेराल्ड हाऊस इमारतीतील यंग इंडियन कार्यालयाला टाळे ठोकले. शिवाय परवानगीशिवाय हे कार्यालय खोलू नये असे स्पष्ट निर्देश EDने दिले आहेत. आधी या प्रकरणात ईडीकडून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली होती. यावरच आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी आणि खासदार राहूल गांधी यांना अटक होणार असल्याचा दावा केला आहे.

या सर्व पार्श्वभुमीवर कॉंग्रेस कार्यालय, सोनिया गांधी यांचं निवासस्थान तसेच राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. यातच राहुल गांधी हे त्यांचा पुर्वनियोजित कर्नाटक दौरा रद्द करून पुन्हा दिल्ली ला रवाना झाले आहेत. ५ ऑगस्टला कॉंग्रेसचं महागाई विरोधात आंदोलन करण्यात येणार होतं त्यापुर्वी ही कारवाई केली जात असल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेसची निदर्शनं

EDकडून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी झाल्यामुळे काँग्रेसने राजधानी दिल्लीसह देशभर आंदोलनं केली होती. त्याशिवाय EDने काँग्रेस नेते पवन बन्सल आणि मल्लिकार्जुन खरगे यांचीदेखील चौकशी केली होती. जून महिन्यात सलग पाच दिवस ईडीने राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. ईडीने त्यांची जवळपास ५० तास चौकशी केली होती.

नॅशनल हेराल्ड काय आहे? (What is National Herald)

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वर्तमानपत्र हे महत्वाची भुमिका बजावतात. हे जाणून पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Neharu) यांनी ९ सप्टेंबर 1938 मध्ये नॅशनल हेराल्ड या वर्तमानपत्राची स्थापना केली. मात्र 1942 मध्ये या वर्तमानपत्रावर ब्रिटीशांनी बंदी घातली. त्यानंतर 1945 आणि 1946 मध्ये नॅशनल हेराल्ड पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर 1946 ते 1950 दरम्यान फिरोज गांधी (Firoz Gandhi) हे नॅशनल हेराल्डचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. मात्र पंडित नेहरू हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी नॅशनल हेराल्डच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. पण त्यानंतरही नॅशनल हेराल्ड या वर्तमानपत्रावर काँग्रेसची पकड कायम होती. तर नॅशनल हेराल्डसंबंधी बोलताना पंडित नेहरू म्हणाले होते की, नॅशनल हेराल्ड हे काँग्रेसच्या धोरणांचा पुरस्कार करणारे वर्तमानपत्र असले तरी त्याचा स्वतंत्र दृष्टीकोण आहे, असं मत व्यक्त केले होते. मात्र 1 एप्रिल 2008 मध्ये आर्थिक अडचण निर्माण झाल्याने नॅशनल हेराल्ड हे वर्तमान पत्र बंद पडले. मात्र मार्च 2016 मध्ये असोसिएट जर्नलने या वर्तमानपत्राची डिजिटल आवृत्ती सुरू करण्याची घोषणा केली.

नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय आहे?

पंडित नेहरु यांनी सुरू केलेले नॅशनल हेराल्ड 2008 मध्ये बंद पडले. त्यानंतर मार्च 2016 मध्ये असोसिएट जर्नल लिमिटेड या कंपनीने नॅशनल हेराल्डची डिजिटल आवृत्ती सुरू केली. मात्र त्यावेळी नॅशनल हेराल्ड कंपनीची मुळ कंपनी असलेल्या असोसिएट जर्नल लिमिटेड या कंपनीची मालमत्ता 2 हजार कोटींच्या आसपास होती. मात्र सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या यंग इंडिया कंपनीने ही मालमत्ता अवघ्या 50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. (BJP Leader Subramaniam swami allegation on young indian company owned by Congress leader soniya Gandhi And Rahul Gandhi)

तसेच 2008 मध्ये हे वृत्तपत्र बंद पडल्यानंतर काँग्रेसने एजीएल (Associate Journal Ltd) कंपनीला 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले होते. मात्र 2010 मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी 'यंग इंडियन' नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची प्रत्येकी 38 टक्के भागीदारी आहे तर उर्वरित हिस्सा मोतीलाल बोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होता. मात्र असोसिएटेड जर्नल लिमिटेडला काँग्रेसने दिलेल्या 90 कोटी रुपयांच्या कर्जाच्या मोबदल्यात या कंपनीची 99 टक्के भागीदारी यंग इंडियन कंपनीला मिळाली असल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

तसेच AJL कंपनीची मालमत्ता ही 2000 कोटी रुपयांची होती. मात्र काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी एजीएल ही कंपनी हस्तगत करण्यासाठी काँग्रेस पक्षाचा निधी वापरल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्यामुळे त्याच प्रकरणात सध्या ED कडून राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांची चौकशी सुरू आहे. ED च्या चौकशीवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल (Congress allegation on Modi government) राहुल गांधी हे देशाच्या नागरिकांचे प्रश्न मोदी सरकारला विचारतात. त्यामुळे मोदी सरकारकडून राहुल गांधी यांना लक्ष केले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू; पण नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे?राहुल गांधी यांची ED कडून जी चौकशी सुरू आहे. या प्रकरणात काँग्रेसकडून व्हिक्टीम कार्ड खेळलं जात असल्याचा आरोप भाजप नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Tags:    

Similar News