त्या महिलेच्या विरोधात मुंडे यांचे मेव्हणे पुरुषोत्तम केंद्रे यांचीही तक्रार

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात मुंडे यांचे मेव्हणे पुरुषोत्तम केंद्रे यांनी देखील तक्रार दाखल केली आहे.;

Update: 2021-01-15 10:54 GMT

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर एकच खळबळ माजली. दरम्यान, आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागताना दिसत आहे. संबंधित महिलेविरोधात अनेकांनी ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले जात आहेत. आता धनंजय मुंडे यांचे मेव्हणे पुरुषोत्तम केंद्रे यांनी देखील तक्रार दाखल केली आहे. तर काल भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी देखील या महिले विरोधात आरोप करत तक्रार दाखल केल्या नंतर या प्रकारणास वेगळंच वळण येत आहे. यामुळे मुंडे यांच्या विरोधातील आरोपाची दाहकत काहीसी कमी होत आहे. हेगडे यांनी संबंधित महिलेविरोधात पोलिसांना एक पत्र दिलं आहे.

या मध्ये आपल्यालाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्या २०१० पासून मला सतत कॉल आणि मेसेज करत होत्या. सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या, असा आरोप करून त्यांनी आपल्या वरिष्ठांनाच तोंडावर पाडले आहे. मनसेचे नेते मनिष धुरी यांनीही रेणु शर्मावर आरोप केल्यानंतर रेणू शर्माचा आणखी एक कारनामा उघड झाला होता, रिझवान कुरेशी नामक एअरवेज अधिकाऱ्यावरही आधी लगट मग पोलिसात तक्रार केल्याचं उघड झालं होतं.आता धनंजय मुंडे यांचे मेव्हणे पुरुषोत्तम केंद्रे यांनी देखील तक्रार दाखल केली आहे.

Tags:    

Similar News