शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' नाट्यप्रयोगाला पुणे विद्यापीठाचा नकार

Update: 2024-04-12 09:04 GMT

पुणे : 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाच्या प्रयोगाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परवानगी नाकारली आहे. महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १२ एप्रिल शुक्रवार रोजी हा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.

नाटकाच्या प्रयोगाला परवानगी नाकारण्याचे ठोस कारण विद्यापीठाकडून आजुन स्पष्टं करण्यात आले नाही. मात्र या नाटकाचा प्रयोग पुर्वी झाला असल्याने पुन्हा या नाटकाचा प्रयोग नको, असं कारण देत नाटकाला परवानगी नाकारली आहे, अशी माहिती विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे अक्षय कांबळे यांनी दिली.

जयंतीनिमित्त विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या समितीने हा नाटयप्रयोग सादर करण्यास नकार दिला आहे. समितीच्या या निर्णयाला विद्यार्थी प्रतिनिधींकडून विरोध केला जात आहे. ''शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाचा प्रयोग सादर करावा, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली असून स्वाक्षरी मोहिमही राबवण्यात येत आहे.

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यासाठी विद्यापीठात प्र-कुलगुरू पराग काळकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. विजय खरे, रवींद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, प्रा. प्रभाकर देसाई, चारुशीला गायके, डॉ. अपर्णा राजेंद्र, प्रा. विलास आढाव, डॉ. अभिजित कुलकर्णी, सुरेश भोसले, प्रा. मनोहर जाधव, अक्षय कांबळे आदींची समिती स्थापन करण्यात आली होती.

विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनी स्थापन केलेल्या शिव-फुले-शाहू- आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीतर्फे ११ ते १४ एप्रिल या कालावधीत 'जागर समतेच्या विचारांचा' या अंतर्गत व्याख्यानमाला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत शुक्रवारी 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजित करण्यात यावे. अशी मागणी कारण्यात आली होती.

कार्यक्रमासंदर्भात ८ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत नाटकाच्या प्रयोगाला विद्यापीठ प्रशासनाने नकार दिल्याची माहिती समोर येत आहे.

बहुजनांची चळवळ मनूवादी प्रशासकांच्या हाती गेलेली आहे. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर महोल्ला ह्या नाटकाला काहीही कारण नसताना ते फक्त परिवर्तनशील नाटक आहे म्हणूनच विद्यापीठने या नाटकाला परवानगी नाकारली. स्वतःला पुरोगामी म्हणवाणाऱ्या प्रशासकांचा खरा चेहरा समोर आला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठात सातत्याने जो उजव्या विचारसरणीकडून हिंसाचार होतो. त्याला खतपाणी कोण देत असेल? हे ही ह्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. असा आरोप अक्षय कांबळे (सचिव, महाराष्ट्रप्रदेश राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस) यांनी केला आहे.

Tags:    

Similar News